WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

बकरी पालन : कसे करावे ? खर्च ,नफा किती याची सविस्तर माहिती | Bakari Palan Marathi Mahiti

Bakari Palan Marathi Mahiti : नमस्कार मित्रांनो , या लेखामध्ये आपण बकरी पालन कसे करायचे ? त्या पासून उत्पन्न किती मिळते ? अशी सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत . तसेच एका शेतकरी बांधव याचा अनुभव सुद्धा येथे तुम्हाला देण्यात आला आहे .

Bakari Palan Marathi Mahiti | बकरी पालन योजना मराठी माहिती | बकरी पालन कसे करावे ? | बकरी पालन व्यवसाय कसा करावा याची सविस्तर माहिती येथे देण्यात आली आहे .

बकरी पालन व्यवसाय करून किती कमवू शकता .

बकरी पालन करून तुम्ही 2 लाख पेक्षा जास्त कमवू शकता . यांचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री. रमेश गावीत ( सुरगाणा तालुक्यातील शेतकरी ) हे आहेत .

श्री. रमेश गावीत यांनी शेती बरोबर जोडधंदा म्हणून शेळी पालन 2023 साली निवडला . त्यांनी 4 हजार रुपये प्रमाणे १० चांगल्या जातीच्या गाबन असलेल्या शेळ्या खरीदी केल्या . त्या या शेळ्या शेजारील गावामध्ये फिरून खूप तपास करून घेतल्या .

Bakari Palan Marathi Mahiti
Bakari Palan Marathi Mahiti

या बकऱ्या अश्या त्यांनी निवडल्या की एका वेळी २ पिले व्हायची. अशी १० बकरी यांना २-२ पिले झाल्यावर २० पिल्ले झाली होती . त्यांनी या बकरी पिलांची खूप चांगली काळजी घेतली . पुडील ६-७ महिन्यामध्ये ही पिल्ले मोठी झाली होती .

त्यांनी एक बकरा हा ७ हजार ते ९ हजार रु पर्यन्त विकला . आपण एक बकरा ७ हजार रुपये ला गेला असे समजू

बकऱ्या गुणिले ₹७०००/बकरी = ₹१४०,००० रुपये हे त्याला मिळाले त्यामध्ये ४०,००० हे बकऱ्या खरेदी साठी गुंतवले होते . तरी रमेश यांना १ लाख रुपये हे मिळाले आहेत . आणि तुम्हाला माहिती असेल बकऱ्या ह्या वर्षातून २ वेळा पिल्ले देतात . त्यामुळे त्यांना वर्षाला पुढे खूप नफा हा मिळणार आहे .

बकरी पालन कधी सुरू करावे ?

बकरी पालन हे तुम्ही ऑक्टोबर महिन्या मध्ये सुरू करू शकता . या कालावधीत पाऊस हा संपत आलेला असतो . आणि बकरी पालन करण्यासाठी तुम्ही गाबन असलेल्या बकऱ्या ह्या निवडायच्या आहेत .

ऑक्टोबर महिन्यात व्यवसाय सुरू केल्यास तुमची पिले ही एप्रिल-मे मध्ये विकायला तयार होत असतात . त्यामुळे तुम्ही कधी तोट्यात येणार नाही .

बकरी साठी चारा कसा द्यायचा ?

एका बकरी साठी किमान रोज ३ किलो चारा लागतो . तर तुम्ही तुमच्या शेतीमध्ये चारा हा तयार करू शकता . धाण देवू शकता . भुईमूनग – हरभरा याचा हिरवा पाला दिला तर बकरी चांगली राहते .

जर तुमच्या बोकड यांना चांगला भाव पाहिजे असेल तर त्यांना चांगला खान -पाण हे घालायचे आहे . चांगली बकरी असेल तर तुम्हाला १०-१२ हजार रुपये पर्यन्त किमत मिळू शकते .

बकरी पालन केल्याचे फायदे काय आहेत ?

जर तुम्ही बकरी पालन केले तर तुम्हाला खालील फायदे हे मिळणार आहेत .

  • तुम्हाला चांगले उत्पन्न मिळणार आहे .
  • शेतीला बकरी पालन हा पूरक व्यवसाय ठरणार आहे .
  • तुम्हाला घरी काम उपलब्ध होईल . कुठे कामला जायची गरज भासणार नाही .

तर मित्रांनो अश्या प्रकारे तुम्ही बकरी पालन हे करू शकता . जर तुम्हाला बकरी पालन बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या WhatsApp चॅनल मध्ये सामील व्हा . येथे आम्ही खूप चांगली माहिती ही पुरवत असतो .

Leave a Comment