Bambu Lagvad Yojana Maharashtra : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकार शेतकरी हितार्थ विविध प्रकारच्या योजना राबवत असते . ज्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या अर्थीक विकासवाढीसह त्यांच्या शेती उत्पन्नाला आर्थिक जोड म्हणून एक योजना सुरू केली आहे . जिचे नाव आहे. बांबू लागवड अनुदान योजना असे आहे. ज्यामध्ये महारस्त्रातील शेतकऱ्यांना सरकारतर्फे बांबू लागवडीसाठी अनुदान देण्यात येते.
Bambu Lagvad Yojana Maharashtra | बांबू लागवड योजना काय आहे ? | ऑनलाइन अर्ज / ऑफलाइन अर्ज कसा करायचा ? याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण येथे समजून घेणार आहोत .
बांबू लागवड योजना ओळख
मित्रांनो, शेती हा महाराष्ट्रातील नागरिकांचा जास्त प्रमाणामध्ये केला जाणारा पारंपरिक व्यवसाय आहे . ज्यामध्ये राज्यातील बहुतांश शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याकारणाने ते आपल्या व शेतीच्या उदरनिर्वाहासाठी बँकेकडून कर्ज घेतात व शेतात कबाडकष्ट करून शेती पिकावतात.
परंतु अनियमित पर्जन्य वादळ, पाऊस तसेच ईतर कारणांमुळे शेतीचे अतोनात नुकसान होऊन परिणामी शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान होते. या गोष्टी लक्षात घेत महाराष्ट्र शासनाने बांबू लागवड योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे.
योजनेचे नाव | बांबू लागवड योजना |
राज्य | महाराष्ट्र |
लाभ व शासन निर्णय | येथे क्लिक करा |
अनुदान | 175 / प्रती बांबू |
बांबू शेतीचे फायदे काय आहेत ?
तर मित्रांनो, बांबू शेतीचे महत्वपूर्ण फायदे खालीलप्रमाणे आहेत.
- बांबू ही एक जलदगतीने वाढणारे पीक आहे.
- बांबू उत्पादनाला खर्च कमी येतो
- बांबू पिकाला पानी कमी लागते.
- बांबू पिकाचे अनेक फायदे आहेत.
- बांबूची लागवड शेतकऱ्यांसाठी चांगले उत्पन्न मिळवून देवू शकते .
बांबू लागवड योजनेसाठी पात्रता काय आहे ?
बांबू लागवड योजनेसाठी आपल्याला खालीलप्रमाणे काही पात्रता आवश्यक आहेत.
- अर्जदार यांच्याकडे सातबारा असणे आवश्यक किंवा फॉरेस्ट चे प्रमाणपत्र
- सामायिक क्षेत्र असल्यास सामायिक खातेदाराचे सहमती पत्र
- शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी, बांबू शेतकऱ्यांचा समूह हे या योजनेसाठी पात्र असतील.
तर मित्रांनो वरील पात्रता आहे तुम्हाला बांबू लागवड करण्यासाठी पूर्ण करावी लागणार आहे.
बांबू लागवड योजनेचे फायदे काय आहेत ?
सदरील बांबू लागवड योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रती रोपटे 175 रुपये अनुदान दिले जाते. हे अनुदान तीन वर्षासाठी विभागून दिले जाते. वन विभाग शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देते ज्यामध्ये रोपांच्या देखभलीसाठी खत, पानी, निंदणी, संरक्षण या कामासाठी सुद्धा अनुदान दिले जाते.
अधिक माहिती तुम्ही खालील फोटोमध्ये बघू शकता. किंवा शासन निर्णय पूर्ण वाचा.
तसेच या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकरी विविध प्रकारच्या बांबू प्रजाती निवडू शकतात ज्यामध्ये विदर्भात आढळणारी मानगा ही स्थानिक प्रजाती तसेच बालकुआ, ब्रँडीसली, नूतन, तुलडा निवडू शकतात आणि सदरील योजनेचे अनुदान हे पात्र लाभार्थी शेतकरी यांच्या खात्यावर थेट dbt च्या माध्यमातून जमा करण्यात येते.
सदरील योजनेसाठी कागतपत्रे काय लागतील ?
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- मोबाइल नंबर
- ई-मेल आयडी
पासपोर्ट साईज फोटो - बँक पासबुक
बांबू लागवड योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
तर शेतकरी मित्रांनो, सदरील बांबू लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी वन विभागाच्या कार्यालयातून अर्ज फॉर्म मिळवू शकतात. अर्ज फॉर्म पूर्ण भरून आवश्यक कागतपत्रांसाह वन विभागाच्या कार्यालयात जमा करावा. अर्जाची छाननी करून पात्र शेतकऱ्यांना सदरील बांबू लागवड योजनेचा लाभ हा दिला जाईल.
बांबू लागवड योजनेचा लाभ तुम्ही मनरेगा मार्फत सुद्धा घेवू शकता . अधिक माहिती साठी पंचायत समिति आणि ग्रामपंचायत मध्ये संपर्क हा साधायचा आहे .
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बांबू लागवड योजनेविषयी सविस्तर पणे माहिती पहिली. अशाच प्रकारची माहिती हवी असल्यास तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता.
मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आज आपण बघितले की बांबू लागवड योजनेचा लाभ कसा घ्यायचा ? आशा करतो की वरील माहिती तुम्हाला समजली असेल. मी जर काही अडचण येत असेल तर तुम्ही खाली कमेंट करायची आहे तुम्हाला नक्की मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करू.
1 thought on “बांबू लागवड योजना 2024 | Bambu Lagvad Yojana Maharashtra”