Biyane Anudaan Yojana Maharashtra : महाराष्ट्र सरकार या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी विविध योजना राबवत असते. त्यामधील आज आपण बियाणे अनुदान योजना ही पाहणार आहोत. खरीप हंगामासाठी शेतकरी यांना बियाणे खरेदी करण्यासाठी सरकार हे अनुदान देत आहे.
बियाणे अनुदान पाहिजे असल्यास तुम्ही महाडीबीटी या पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज हे करायचे आहेत. बियाणे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतील याची सविस्तर माहिती आपण येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
बियाणे अनुदान योजना ओळख
महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान हे देत आहे. तर ही योजना महाराष्ट्र कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेची लाभार्थी निवड ही लॉटरी पद्धतीने केली जात आहे.
अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज हे करावे लागत असतात. या योजनेची थोडक्यात माहिती तुम्ही खाली पाहू शकता.
योजनेचे नाव | बियाणे अनुदान योजना |
ऑफिशियल वेबसाईट | महाडीबीटी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
वेबसाईट लिंक | येथे क्लिक करा |
Biyane Anudaan Yojana Maharashtra पात्रता व अटी
बियाणे अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील पात्रता व अटी पूर्ण करावे लागत असतात.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा जमातीमधील असल्यास त्यांना जातीचा दाखला देणे बंधनकारक राहील.
- अर्जदार यांच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेल्या नसावा.
मित्रांनो वरील पात्रता व अटी तुम्हाला ह्या पूर्ण करावे लागत असतात. या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्रे कोणती लागतील याची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहेत.
बियाणे योजना कागदपत्र यादी
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता ही भासणार आहे. ही कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही स्वतः मोबाईलवरून या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात.
- आधार कार्ड
- आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक
- सातबारा व आठ अ उतारा
- राष्ट्रीयकृत बँक मध्ये बँक खाते
- रेशन कार्ड
- मोबाईल नंबर
- जीमेल आयडी
इत्यादी माहिती व कागदपत्रे ही तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागत असतात.
ऑनलाइन अर्ज कसा करायचा ?
बियाणे अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला खालील प्रकारे ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील स्टेप्स वापरायचे आहेत.
१ . सर्वात आधी महाडीबीटी या पोर्टल ला भेट द्यायचे आहे. किंवा येथे क्लिक करून तुम्ही महाडीबीटी या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊ शकता.
२ . त्यानंतर तुम्हाला “नवीन अर्जदार नोंदणी” या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमची नवीन नोंदणी ही करायची आहे. किंवा जर तुमचा आधीच युजर आयडी आणि पासवर्ड बनलेला असेल तर तुम्ही लॉगिन या बटणावर क्लिक करून लॉगिन करायचे आहे.
३ . लॉगिन केल्यानंतर तुम्हाला अर्ज करा या ऑप्शन वरती क्लिक करून. बियाणे या बाबीसाठी अर्ज हा करायचा आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्या पिकासाठी अनुदान हवे आहे ते पीक निवडायचे आहे व तुम्हाला किती पाहिजे आहे ते सुद्धा तुम्ही इथे भरायचे आहे.
मित्रांनो वरील प्रमाणे तुम्हाला बियाणे अनुदान योजनेसाठी महाडीबीटी या पोर्टल वरती अर्ज करायचा आहे. अर्ज करत असताना जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला नक्की व्हाट्सअप ग्रुप वरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न हा आपली टीम करेल.
तर मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आज आपण समजून घेतले की बियाणे अनुदान योजनेचा लाभ कसा घ्यायचा ? त्यासाठी कागदपत्रे कोणते लागतील? तर मित्रांनो अशा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या किसान टाईम या पोर्टलला नक्की भेट देत रहा.
1 thought on “बियाणे : खरीप हंगामसाठी सरकार देत अनुदान तत्वावर अनुदान | Biyane Anudaan Yojana Maharashtra”