Download Digital SatBara : – नमस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आपण आपल्या जमिनीचा सातबारा मोबाईल वरून कसा डाऊनलोड करायचा? याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत.
सातबारा डाऊनलोड कसा करायचा | मोबाईल वरून सातबारा डाऊनलोड कसा करायचा ? | ऑनलाईन सातबारा कसा पाहायचा ? याची सविस्तर माहिती आपण येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सातबारा ओळख – Download Digital SatBara
जर तुमच्याकडे सातबारा असेल तर तुम्ही भरपूर सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता. त्यापेक्षा खूप महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तुमची जमीन नावावर असल्याचे प्रमाणपत्र हे सातबारा म्हणून तुम्ही वापरू शकता.
मित्रांनो जर तुम्हाला अडचणीच्या वेळेस सातबारा काढायचे असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून डाऊनलोड करू शकता. हा सातबारा तुम्ही सर्व सरकारी कामांसाठी वापरू शकता.
कागदपत्रे नाव | डिजिटल सातबारा |
राज्य | महाराष्ट्र |
डाऊनलोड करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
शुल्क | 15 रुपये |
डिजिटल सातबारा कसा डाऊनलोड करायचा ?
डिजिटल सातबारा हा सर्व सरकारी कामांसाठी मान्य आहे. त्यामुळे जर तुम्ही तलाठी यांच्यापर्यंत पोहोचू शकत नसाल तर तुम्ही स्वतःच्या मोबाईल वरून डाऊनलोड केलेल्या सातबारा हा प्रिंट काढून सरकारी कामांसाठी वापरू शकता.
तर हा सातबारा कसा डाऊनलोड करायचा याची माहिती तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे.
१ . सर्वात आधी तुम्ही डिजिटल सातबारा या ऑफिशियल पोर्टल वरती भेट द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे स्क्रीनही दिसणार आहे.
२. त्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनाच्या खाली रजिस्ट्रेशन या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला सर्वात आधी नवीन रजिस्ट्रेशन हे करायचे आहे. नवीन रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला पर्सनल माहिती ॲड्रेस इन्फॉर्मेशन आणि तुमचा एक युजर आयडी आणि पासवर्ड हा तयार करायचा आहे.
३. त्यानंतर तुम्ही तयार केलेल्या युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करायचे आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला खालील प्रकारे स्क्रीन दिसणार आहे.
४. त्यानंतर तुम्हाला सातबारा डाऊनलोड करण्यासाठी १५ रुपये हे ऍड करावे लागतील. तुम्ही पंधरा रुपये ऍड करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे जिल्हा, तालुका,, गाव ,अशाप्रकारे निवडायचा आहे व तुमच्या शेतीचा गट क्रमांक हा टाकायचा आहे.
मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही तुमचा डिजिटल सातबारा हा डाऊनलोड करू शकता. अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हायचे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती ही तुम्हाला समजावून सांगण्यात येईल.
तर मित्रांनो आज आपण बघितले की डिजिटल सातबारा हा कसा डाऊनलोड करायचा ? अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर आपल्या नातेवाईकांना मित्रांना नक्की शेअर करा.
1 thought on “७/१२ : जमिनीचा सातबारा कसा डाऊनलोड करायचा याची सविस्तर माहिती”