WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

कामगार योजना : भांडी संच योजना मराठी माहिती | Kamgar Bhandi Sanch Yojana

Kamgar Bhandi Sanch Yojana : नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार भांडी संच योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये शासनातर्फे पात्र लाभार्थी यांना मोफत तीस वस्तु चा भांडी संच व अनेक प्रकारचे उपयोगी साहित्य मिळत असते.

Kamgar Bhandi Sanch Yojana | कामगार भांडी संच योजना ऑनलाइन अर्ज कसा करायचा ? | कामगार भांडी संच योजना २०२४ याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत .

Bandhkaam Kamgaar Yojana
Bandhkaam Kamgaar Yojana

कांमगार भांडी संच योजना

जर आपल्याला सुद्धा सदरील योजनेविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर सदरील लेखाद्वारे या योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करायचा व त्याचबरोबर यासाठी कागतपत्रे काय काय लागतील याविषयी संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे सदरील लेख काळजीपूर्वक संपूर्ण वाचा.

तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने बांधकाम करत असलेल्या नागरिकांना म्हणजेच बांधकाम कामगारांच्या हितार्थ एक अतिशय महत्वपूर्ण व लाभदायी योजना सुरू केली जिचे नाव बांधकाम कामगार योजना 2024 आहे.

योजनेचे नाव बांधकाम कामगार योजना
लाभ भांड्याचा संच
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
राज्य महाराष्ट्र

Bandhkaam Kamgaar Yojana

ज्यामध्ये महाराष्ट्र ईमारत व ईतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत पात्र लाभयार्थ्याना एक भांडी संच वितरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. ज्यामध्ये 30 प्रकारचे विविध घरघुती वस्तु या पात्र लाभार्थी ना मोफत देण्यात आहे.

भांडी संच यादी

बांधकाम कामगार यांना खालील वस्तु ह्या देण्यात येतात .

वस्तु चा प्रकारनग
ताट04
वाट्या08
पाण्याचे ग्लास04
पातेले झाकणासह01
पातेले झाकणासह01
पातेले झाकणासह01
मोठा चमचा (भातवाडी)01
मोठा चमचा (वरणवाडी)01
पाण्याचा जग01
मसाला डब्बा01
डब्बा झाकणासह (14 इंच)01
डब्बा झाकणासह (16 इंच)01
डब्बा झाकणासह (18 इंच)01
परात01
प्रशर कुक्कर01
कढई01

Kamgar Yojana Documents List

  • आधार कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • पत्याचा कोणताही पुरावा
  • वय प्रमाणपत्र
  • राशन कार्ड
  • ओळख प्रमाणपत्र
  • मोबाइल नंबर
  • 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

पात्रता काय आहे

  • अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा राहवासी असावा.
  • वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • कामगाराने किमान 90 दिवस काम केलेले असावे.
  • कामगार कल्याणकारी मंडळाने कामगारांची नोंदणी करावी.

अर्ज कसा करावा ?

तर मित्रांनो, सदरील योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास आपल्याला सर्वात प्रथम महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट https://mahabocw.in/ वर भेट द्यावी लागेल.

ज्यामध्ये आपली काही माहिती दिल्यानंतर सर्वातप्रथम आपली पात्रता तपासा या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर वेबसाइट च्या होम पेज वर कामगार बटनावर क्लिक केल्यानंतर कामगार नोंदणी पर्याय निवडून त्यामध्ये आपली वायक्तिक माहिती व इतर माहिती संपूर्ण भरायची आहे .

माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आपल्याला सबमिट बटन वर क्लिक करून आपला अर्ज पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे आपण बांधकाम कामगार योजनेसाठी घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

तर मित्रांनो, अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण आजच्या सदरील लेखाद्वारे पहिली. अशाच प्रकारच्या नवनवीन लेख पाहण्यासाठी आमच्या व्हॉटसप ग्रुप ला जॉइन करू शकता.

1 thought on “कामगार योजना : भांडी संच योजना मराठी माहिती | Kamgar Bhandi Sanch Yojana”

Leave a Comment