New Ration Card Apply : नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपले आजच्या या लेखामध्ये.. आज आपण नवीन रेशन कार्ड कसे काढावे याविषयी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो रेशन कार्ड हे आपल्या जीवनसाठी एक अतिशय महत्वपूर्ण घटक आहे जे की सरकार द्वारे वितरित करण्यात येणाऱ्या स्वत धान्य वितरण योजनेचा प्राथमिक लाभ तसेच शासनाच्या विविध प्रकारच्या नवनवीन योजनसाठी एक अतिशय महत्वपूर्ण दस्तावेज आहे.
डॉक्युमेंट नाव | नवीन रेशन कार्ड |
राज्य | महाराष्ट्र |
वेबसाइट | www.rcmc.mahafood.gov.in |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अशा वेळेस काही कुटुंबाकडे नवीन रेशन कार्ड नसते किंवा काही नाव रेशन कार्ड मध्ये जोडणे, काही नाव रेशन कार्ड मधून डिलीट करणे अशा प्रकारच्या कामासाठी आपल्याला तहसील आणि ईतर कार्यालयामध्ये जाऊन चकरा माराव्या लागतात ज्यामध्ये वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो परंतु आजच्या या लेखाद्वारे आपण घरबसल्या आपल्या मोबाइल वर नवीन रेशन कार्ड काढू शकता तर चला मित्रांनो, नवीन रेशन कार्ड कसे काढावे याविषयी सविस्तर माहिती पाहूया.
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी कोणते कागतपत्रे लागतात ?
- कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड
- रहिवासी दाखला (लाइट बिल, सातबारा)
- उत्पन्न दाखला
- शेजारचे रेशनकार्ड झेरॉक्स स्वाक्षरी
- रेशन दुकानदार यांचा दाखला
- मोबाइल क्रमांक
वरील माहिती तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी लागत असते . अधिक माहिती पाहिजे असल्यास गावतिल रेशन दुकानदार यांच्या सोबत संपर्क करा .
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर किती दिवसात रेशनकार्ड मिळेल ?
तर मित्रांनो, आपण संगीतल्याप्रमाणे जर आपण ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड साठी अर्ज केला असेल तर नवीन रेशन कार्ड हे 30 दिवसांत सदरील अर्जदार यांना नवीन रेशन कार्ड किंवा विभक्त रेशनकार्ड मिळणार आहे अशी माहिती सुमित शिंदे, अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर शहर यांनी दिली आहे.
आता रेशनकार्ड धारकांना ही सुविधा मिळणार..
प्रत्येक शिधापत्रिका धारकाचा आधार क्रमांक आता त्यांच्या रेशनकार्ड ला लिंक करण्यात आला आहे. अंत्योदय योजनेतील कुटुंबाला दरमहिन्याला 35 किलो धान्य तर प्राधान्य कुटुंबाला प्रतीव्यक्ती पांच किलो धान्य दिले जाते. केंद्र व राज्य सरकारने हे प्रमाण निश्चित केले आहे.
कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीने त्याचा मोबाइल क्रमांक शिधापत्रिकेला लिंक केल्यास धान्य घेतल्यानंतर त्या व्यक्तीला काही वेळातच त्यासंबंधीचा मराठीतून मोबाइल वर मेसेज येणार आहे .
ज्यामुळे धान्य मिळाले नसल्याच्या किंवा कमी मिळाल्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत .
नवीन रेशनकार्ड साठी अर्ज कसा करावा ?
- तर मित्रांनो, नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याकडे चांगल्या गुणवत्तेचा एक अँन्ड्रॉईड मोबाइल व त्यामध्ये इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला त्या मोबाइल मध्ये www.rcmc.mahafood.gov.in या वेबसाइट वर जायचे आहे.
- त्यानंतर उजव्या कोपऱ्यात खाली ऑनलाइन सेवा या टॅब मध्ये ऑनलाइन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर वर Sign in / Register या बटन वर क्लिक करून Public Login वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर New User! Sign Up Here या बटनवर क्लिक करायचे आहे.
- जर आपल्याला नवीन रेशन कार्ड काढायचे असेल तर तिसरा पर्याय I want to apply for new Ration Card या पर्यायावर क्लिक करून आपले नाव, आधार नंबर, लिंग, मोबाइल नंबर, ईमेल, आणि पासवर्ड टाकून verify करायचे आहे.
- त्यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म ओपेन होईल तो फॉर्म व्यवस्थितपणे भरून submit या बटन वर क्लिक करायचे आहे.
आता आपला अर्ज यशस्वीरीत्या पूर्ण झालेला आहे यामध्ये आपल्याला एक रेफरन्स नंबर मिळेल ज्याद्वारे आपण आपल्या अर्जाची स्थिति बघू शकता.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण घरबसल्या आपल्या मोबाइल द्वारे नवीन रेशन कार्ड किंवा रेशन कार्ड मधील नावे कमी जास्त करू शकता.