WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

ट्रॅक्टर योजना : सरकार देते ट्रॅक्टर खरेदी साठी १ लाख २५ हजार रुपये पर्यन्त अनुदान

Tractor Anudaan Yojana : जर तुम्ही नवीन ट्रॅक्टर खरेदी करणार असाल तर तुम्ही खालील माहिती आधी वाचा समजून घ्या . नक्की तुम्हाला लाभ हा मिळणार आहे .

ट्रॅक्टर अनुदान योजना | ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान किती दिले जाते ? | Tractor Anudaan Yojana महाडीबीटी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? याची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

ट्रॅक्टर अनुदान योजनेची ओळख

महाराष्ट्र शासन हे आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी विविध योजनाही राबवत असते. त्यामध्ये कृषी उप अभियांत्रिकीकरण अभियाना अंतर्गत शेतकरी यांना यंत्र खरेदीसाठी अनुदान हे दिले जाते.

Tractor Anudaan Yojana
Tractor Anudaan Yojana

यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर खरेदीसाठी एक लाख 25 हजार रुपये पर्यंत अनुदानित देण्यात येते. तर हे अनुदान कसे मिळवायचे याची सविस्तर माहिती आपण येथे पाहणार आहोत.

योजनेचे नावTractor Anudaan Yojana
राज्य महाराष्ट्र राज्य
लाभ एक लाख 25 हजार रुपये
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा

ट्रॅक्टर खरेदी अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला वरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर या बाबीसाठी ऑनलाईन अर्ज हे महाडीबीटी या पोर्टल वरती मागविण्यात येत आहेत. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही महाडीबीटी या पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज हे करू शकता.

पात्रता व अटी काय आहेत

ट्रॅक्टर अनुदान जर तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्हाला खालील पात्रता व अटी ह्या पूर्ण कराव्या लागत असतात.

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
  • अर्जदार यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेल्या नसावा.
  • अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा जमातीमधील असल्यास जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • अर्जदारांच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

वरील पात्रता व अटी हे तुम्हाला ट्रॅक्टर अनुदान मिळवण्यासाठी पूर्ण करावे लागणार आहेत.

ट्रॅक्टर अनुदान योजना कागदपत्र यादी

ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता ही भासणार आहे.

  • आधार कार्ड
  • आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक
  • सातबारा
  • आठव उतारा
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड

इत्यादी कागदपत्रे हे तुम्हाला ट्रॅक्टर योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत.

Tractor Anudaan Yojana ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?

Tractor Anudaan Yojana ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करायचा आहेत.

सर्वात आधी तुम्हाला महाडीबीटी या वेबसाईट वरती जायचे आहे. येथे तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणी ऑप्शन दिसत असेल त्या ऑप्शन वरती क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती भरून तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला विचार आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करायचे आहे.

वरील इमेज मध्ये तुम्हाला दिसत आहे की तुमचा यूजर id आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉगिन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या ऑप्शन वरती क्लिक करून ट्रॅक्टर साठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

ऑनलाइन अर्ज करून झाल्यानंतर तुम्हाला स्लीपिंग मिळणार आहे. ती स्लिप तुम्ही स्वतः जवळ ठेवू शकता.

अनुदान किती मिळणार

जर लाभार्थी हा अनुसूचित जाती जमाती किंवा महिला शेतकरी असेल तर अशा लाभार्थ्यांना एक लाख 25 हजार रुपये पर्यंत अनुदान हे मिळणार आहे.

जर लाभार्थी हे खुल्या प्रवर्गातील असतील तर त्यांना एक लाख रुपये पर्यंत अनुदान हे देण्यात येते. Tractor Anudaan Yojana

या योजनेची निवड झाल्यावर ती तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती मेसेज येत असतो आणि त्यानंतर तुम्ही पुढील सात ते आठ दिवसांमध्ये कागदपत्र ही पुन्हा अपलोड करायचे असतात.

तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची माहिती समजलेली असेल. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या कृषी ऑफिसला भेट देऊ शकता. किंवा तुम्ही आपल्या व्हाट्सअप कुठल्या जॉईन व्हा येथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती देण्यात येईल.

Leave a Comment