Namo Shetkari 4th Installment Date : नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेविषयी आपण आजच्या या लेखाद्वारे संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी मदत व त्यांच्या आर्थिक उत्पन्नाला जोड म्हणून एक कल्याणकारी योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
सदरील योजनेमध्ये पात्र लाभार्थी शेतकरी यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे दर चार महिन्याला 2 हजार रुपयांचा हप्ता असे एकूण मिळून 3 हप्ते म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना सदरील योजनेदवारे थेट dbt च्या माध्यमातून मिळतात.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेविषयी थोडक्यात..
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री किसन सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत देते.
YOJANA NAME | नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना |
राज्य | महाराष्ट्र |
ऑफिशिअल वेबसाईट | येथे क्लिक करा |
लाभ | प्रति वर्ष सहा हजार रुपये |
त्याच धर्तीवर राज्य सरकार देखील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत देणार आहेत. त्यामुळे आता दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 12000 रुपये येणार आहेत. म्हणजेच प्रत्येकी चार महिन्याला शेतकऱ्यांना आता 2000 रुपयाएवजी 4000 रुपये मिळणार आहेत.
नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?
मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक 6000 रुपये येतात अगदी त्याच शेतकरी बांधवांना ह्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु त्यासाठी ईकेवायसी पूर्ण असणे बंधनकारक आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी कोणताही वेगळा ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज भरला जात नाही. पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आपोआप पात्र ठरवले जातात व त्यांना ह्या योजनेचा लाभ दिला जातो.
नमो शेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ता कधी येणार ?
तर मित्रांनो सदरील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत एकूण मिळून 3 हप्ते वितरित करण्यात आले आहे ज्यामध्ये एकूण ६००० रुपये हे लाभार्थी शेतकरी यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत
आणि आता सर्व शेतकरी बांधव हे नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या योजनेच्या प्रतिक्षेवर आहेत तर त्यांच्यासाठी एक आनंददायी बातमी आहे की आगामी हप्ता हा येत्या जून 2024 महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जमा केला जाऊ शकतो.
नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक कागतपत्रे..
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला खालील कागतपत्रांची आवश्यकता असेल.
- लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- मोबाइल नंबर
- महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा
- पीएम किसान नोंदणी क्रमांक
- सातबारा
- बँक पासबूक
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वार्षिक ६००० रुपयांचा लाभ देणाऱ्या योजनेची संविस्तारपणे माहिती बघितली.
तर मित्रांनो या लेखामध्ये आपण नमो शेतकरी योजना काय आहे ? व Namo Shetkari 4th Installment Date कधी मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण येथे पाहिली आहे. आशा करतो की वरील माहिती तुम्हाला आवडली असेल. अशाच प्रकारच्या मातीसाठी तुम्ही आपल्या पोर्टलला नक्की भेट देत राहा.