WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Power Tilar Anudaan Yojana | पॉवर टिलर अनुदान योजना

Power Tilar Anudaan Yojana : नमस्कार मित्रांनो, या लेखांमध्ये आपण पॉवर टिलर खरेदीसाठी अनुदान कसे मिळवायचे ? त्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार ? ऑनलाइन अर्ज कसा व कुठे करायचा ? याची सविस्तर माहिती येथे समजून घेणार आहोत.

महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी विविध योजना हे राबवत असते. शेतकरी यांच्यासाठी ज्या सुद्धा योजना आहे त्या योजनांचे सर्व फॉर्म हे महाडीबीटी या पोर्टल वरती भरण्यात येतात.पॉवर टिलर खरेदी करायचे असल्यास तुम्ही महाडीबीटी या पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज करू शकता.

Power Tilar Anudaan Yojana
Power Tilar Anudaan Yojana

पॉवर टिलर अनुदान योजना ओळख

सदरची योजना ही महाराष्ट्र कृषी विभागामार्फत राबविण्यात येते. यासाठी जास्तीत जास्त अनुदान हे 75 हजार रुपये पर्यंत देण्यात येते. या योजनेचे ऑनलाइन फॉर्म हे MahaDBT या पोर्टल वरती भरण्यात येत आहेत. अधिक माहिती तुम्हाला खाली टेबल मध्ये देण्यात आलेली आहे.

योजनेचे नाव Power Tilar Anudaan Yojana
विभाग कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अनुदान 75 हजार रुपये
राज्य महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
पॉवर टिलर अनुदान योजना

Power Tilar Anudaan Yojana पात्रता व अटी

पॉवर टिलर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला खालील पात्रता व अटी हा पूर्ण कराव्या लागत असतात.

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे
  • अर्जदार हा आधार कार्ड धारक असावा
  • यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

वरील पात्रता व अटी ह्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागत असतात . तरच तुम्ही पॉवर टिलर या बाबीचा लाभ घेऊ शकणार आहात.

Power Tilar Anudaan Yojana कागदपत्रे कोणती लागतात ?

पॉवर टिलर या बाबीसाठी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता ही भासत असते.

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • यंत्र कोटेशन
  • आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक
  • मोबाईल नंबर
  • जीमेल खाते

मित्रांनो, महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करताना तुम्हाला वरील माहिती व कागदपत्रांची आवश्यकता ही भासत असते.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा ?

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करायचे आहेत.

  • सर्वात आधी महाडीबीटी या पोर्टलला भेट द्या.
  • त्यानंतर तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणी करायचे आहे. नवीन शेतकरी नोंदणी करताना तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे.
  • तुम्ही तयार केलेला युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत पॉवर टिलर या बाबीसाठी अर्ज करायचा आहे.
  • अर्ज केल्यानंतर तुम्हाला शुल्क हे ऑनलाईन पे करायचे आहे.
  • त्यानंतर आलेली पावती तुम्ही प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवायचे आहे.

वरील प्रमाणे तुम्ही पॉवर टिलर या बाबीसाठी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत महाडीबीटी या पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे.

तर मित्रांनो या लेखांमध्ये आपण बघितले की पॉवर टिलर या बाबीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा. मित्रांनो आशा करतो की वरील माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की आपल्या इतर ग्रुप वरती शेअर करा.

Leave a Comment