Cycle Vatp Yojana Marathi Mahiti : नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये मुलीना शाळेत जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ज्यामध्ये शाळा खूप दूर असल्यामुळे किंवा तिथे वाहतुकीचे साधन उपलब्ध नसणे किंवा त्यासाठी पैशाची अडचण या सर्व अडचणींचा सामना करत ग्रामीण भागातील मुलीना शिक्षण घ्यावे लागते. बऱ्याच वेळा या सर्व परेशानी चा सामना करत असताने काही मुली आपले शिक्षण मध्येच सोडून देतात ज्यामुळे त्यांचे खूप मोठे नुकसान होते.
या सर्व बाबी महाराष्ट्र शासनाने लक्षात घेता आता ग्रामीण भागातील गरजू मुलीना सायकल वाटप Cycle Vatp Yojana करण्याचा एक अतिशय महत्वपूर्ण आणि कल्याणकारी निर्णय घेतला असून ज्यामध्ये सायकल वाटप योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील दुर्गम भागातील शाळा शिकत असलेल्या मुलीना सायकल वाटप म्हणजेच सायकल घेण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
तर मित्रांनो, आपण सुद्धा या योजनेविषयी माहिती जाणून घेऊ ईछिता तर सदरील लेख संपूर्ण व काळजीपूर्वक वाचा. यामध्ये सदरील सायकल वाटप योजना काय आहे, त्यासाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे, कागतपत्रे काय लागतील याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या लेखाद्वारे आपणास संविस्तारपणे मिळणार आहे.
सायकल वाटप योजना काय आहे ?
सायकल वाटप योजना महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली एक कल्याणकारी योजना आहे ज्यामध्ये गरजू व ग्रामीण भागातील मुलीना इयता 8वी ते 12 वी पर्यंतचा शालेय शिक्षणाच्या मध्ये सायकल अनुदानासाठी पात्र असेल. तसेच सदरील सायकल वाटप योजनेअंतर्गत बऱ्याच मुलींचे शिक्षण पूर्ण होण्यास मदत होईल.
योजनेचे नाव | Cycle Vatp Yojana Marathi Mahiti |
राज्य | Maharashtra |
कुणासाठी | 8 वी ते 12 वी मध्ये शिकत असलेल्या मुलींसाठी |
लाभ | रु. ५००० अनुदान |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी व सुलभ आल्यामुळे यासाठी पालकांना कुठल्याही शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही व तसेच सदरील योजनेचे अनुदान (सायकल घेण्यासाठी अर्थसाहाय्य) हे थेट dbt च्या माध्यमातून थेट मुलींच्या खात्यात जमा करण्यात येत असल्याने त्याचा फायदा थेट मुलीना होणार आहे.
सायकल वाटप योजनेसाठी पात्रता काय असेल ?
लाभार्थी विद्यार्थिनी ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
लाभार्थी विद्यार्थिनी ही ग्रामीण भागातील असावी.
लाभार्थी विद्यार्थिनी ही ईयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेत असावी.
सायकल वाटप योजनेसाठी आवश्यक कागतपत्रे
- आधार कार्ड
- शाळेची शिफारस
- बँक पासबूक
- जातीचा दाखला
- रहिवाशी दाखला
- Gmail Id
- मोबाइल नंबर
वरील माहिती ही तुम्हाला लागत असते . अधिक माहिती साठी शेळेतील प्राचार्य यांच्या सोबत संपर्क हा करायचा आहे .
सायकल वाटप योजनेअंतर्गत समाविष्ट शाळा
- शासकीय शाळा
- जिल्हा परिषद शाळा
- शासकीय अनुदानित शाळा
तसेच ज्या अनुदानित व शासकीय आश्रमशाळेतील मुलीना डे स्कॉलर प्रवेश दिला जातो व ज्याना दररोज घरापासून दूर ये जा करावी लागते अशा शाळेच्या मुलीना ही योजना लागू करण्यात येईल.
सायकल वाटप योजनेचा हेतु ..
महाराष्ट्र सरकारचे खालील हेतु हे सायकल वाटप करण्याचे आहेत .
- राज्यातील मुलीना आत्मनिर्भर बनवणे
- महाराष्ट्र राज्यातील गरजू मुलीना घरातून शाळेत व शाळेतून घरी येण्यासाठी सायकल वाटप करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे जेणेकरून मुलीना शिक्षणासाठी जास्त कष्ट सोसावे लागणार नाही.
- मुलीना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित करणे
- आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या मुलीना सायकल विकत घेण्यासाठी अर्थसाहाय्य देऊन त्यांना मदत करणे.
Cycle Vatp Yojana Marathi Mahiti किती अनुदान मिळणार ?
प्रथमतः शासनातर्फे लाभार्थी विद्यार्थिनीच्या खात्यावर डी.बी.टी. (Direct Benefist Transfer) च्या अंतर्गत 3500/- रुपये एवढी रक्कम आगाऊ स्वरूपात मिळणार आहे.
त्यानंतर सायकल खरेदी करावी लागेल व सायकल खरेदी केल्यानंतर खरेदी पावती व ईतर कागतपत्रे अपलोड केल्यानंतर त्यांना उर्वरित 1500 थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील. म्हणजेच असे एकूण मिळून 5000 रुपये अनुदान स्वरूपात लाभार्थी विद्यार्थिनीच्या खात्यावर जमा केले जातील.
Cycle Vatp Yojana Marathi Mahiti Application
सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी विद्यार्थिनीना ज्या शाळेत शिकत असतील त्या शाळेत प्राचार्यकडून अर्ज घेऊन व आवश्यक कागतपत्रे घेऊन अर्ज हा शाळेत सादर करायचा आहे किंवा लाभार्थी विद्यार्थिनीना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा हा अर्ज सादर करता येणार आहे.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सायकल वाटप अनुदान योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करून आमच्या व्हॉटसप ग्रुप ला जॉइन व्हा.Cycle Vatp Yojana Marathi Mahiti